प्राचार्य बॅरिस्टर पी.जी. पाटील व प्राचार्य सुमतीबाई पाटील शैक्षणिक शिष्यवृत्ती
प्राचार्य बॅरिस्टर पी.जी. पाटील प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील गरीब, होतकरू, गरजू, अनाथ वर्गातील हुशार गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना 'प्राचार्य बॅरिस्टर पी.जी. पाटील व प्राचार्य सुमतीबाई पाटील शैक्षणिक शिष्यवृत्ती' शिष्यवृत्ती दिली जाते.
१.सदर शिष्यवृत्ती केवळ कला शाखेत अध्ययन करणान्या विद्यार्थ्यांनाच दिली जाईल.
२.बी.ए. भाग १ ते एम.ए. भाग १ या प्रत्येक वर्गातील १० विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती दिली जाईल.
३. विद्यार्थ्यांला गतवर्षीच्या विद्यापीठ परीक्षेमध्ये ६० टक्के गुण प्राप्त असणे आवश्यक आहे.
३.सदर विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे गेल्या आर्थिक वर्षातील (०१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) वार्षिक उत्पन्न २ लाखापेक्षा अधिक असता कामा नये, (सोबत तलाठ्याच्या उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत जोडावी.) सदर विद्यार्थ्यांला इतर कोणतीही शिष्यवृत्ती मिळाली नाही. (शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी) यांचा दाखला शाखाप्रमुखांनी देणे आवश्यक आहे.
४.सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुना भरून महाविद्यालयात जमा करावा.
५. गरीब, होतकरू परंतु गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दि. ३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाठवावेत.
मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर
Comments
Post a Comment