दिव्यांग* विद्यार्थिनींना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

 महाविद्यालयातील बीए /बी कॉम मधील *दिव्यांग* विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, केंद्रशासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत दिव्यांगजन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य  करणे या उद्देशाने दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सन 2023-24 मध्ये सदर शिष्यवृत्ती योजनेकरीता नविन मंजूरीचे (Fresh) आणि नूतनीकरणाचे (Renewa) अर्ज ऑनलाईन पध्दतीने एनएसपी पोर्टल वरून मागविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम केंद्रशासनामार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.


👉🏻 *किमान पात्रता व अटी:* 


1. अपंगत्व टक्केवारी 40 टक्के किंवा त्यापुढील असावी.


2. मागील वार्षिक परिक्षेत उत्तीर्ण झालेला असावा,


3. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा/ स्टायपेंड लाभार्थी नसावा.


4. अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.2.50 लाख पर्यंत असावे.


5. एका कुटुंबातील फक्त दोन अपत्यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल ( जर दुसरे व तिसरे आपत्य जुळे असतील तर सदर योजनेचा लाभ घेता येईल.)


👉🏻ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपध्दती:-


1. दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मैट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी नवीन मंजूरीसाठी व नूतनीकरणसाठी www.scholarshps.gov.in या संकेतस्थळावर आधार क्रमांक नमुद करुन अर्ज ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आवश्यक आहे


2. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.31.12.2023 ही आहे.


3. विद्यार्थ्यांना आधार आयडी (UDID) असने व तसेच लाभार्थ्यांच्या नावे असलेल्या चालू स्थितीत (Operative / Active Mode) बँक खात्याशी सलग्न असणे आवश्यक आहे जेणेकरुन शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासठी आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा करणे सुलभ होईल.


4. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता दिव्यांगजन असल्याचे ओळखपत्र (UDID) असणे आवश्यक आहे.


विद्यार्थी कल्याण विभाग,

मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर

Comments

Popular posts from this blog

HDFC Bank Parivartan's Educational Crisis Scholarship Support (ECSS)

NSP Top Class Education Scheme for SC Students 2024-25

Reliance Foundation Undergraduate Scholarships